वाढदिवसाचे सेलिब्रेशन का करता विचारत गोळीबार, देहूरोड येथे एकाचा मृत्यू, एक जखमी
पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट
देहूरोड: देहूरोड येथे एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादावेळी गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) रात्री साडे अकराच्या सुमारास देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे घडली.
विक्रम गुरु स्वामी रेड्डी (वय 32 रा. गांधीनगर उर्दू शाळेमागे, देहूरोड )असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नंदकिशोर रामपवित्र यादव (वय 42 रा. आंबेडकर नगर दुर्गा माता मंदिराजवळ,देहूरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू रोड येथील आंबेडकर नगर येथे नंदकिशोर यादव यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी, येथे वाढदिवस का साजरा करता, असे म्हणत मारेकरांनी वाद घातला.
आरोपी शाबीर समीर शेख, फैजल शेख, जॉन उर्फ साई तेजा चितामल्ला व महिला आरोपी यांनी येऊन यातील शाहीर शेख नंद कुमार यादव यांना म्हणाला की, तू बहुत बडा हो गया, बडी पार्टी कर रहा है, तुझे बहुत मस्ती आई है. असे म्हणत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
नंदकिशोर यादव यास मारहाण केल्याने जखमी झाला. त्यावेळी विक्रम रेड्डी हा वाद सोडवण्यासाठी मध्ये आल्यानंतर शाबीर शेख यांनी याने त्याच्यावर गोळीबार केला. व हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करून निघून गेला. दरम्यान गोळी लागल्याने विक्रम रेड्डी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नंदकिशोर हे मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0 टिप्पण्या