देवळी आश्रमशाळा येथे व्याख्यान संपन्न
नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे विविध विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सतीष पाटील व प्रमुख पाहुणे श्री.तुषार खैरनार यांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अर्चना मोरे यांनी मांडले
इनर व्हिल ऑफ मिल्कसिटी अंतर्गत "कळी उमलतांना" या विषयावर व्याख्यान डॉ.सौ. मनिषा पाटील यांनी दिले. तसेच गुरुकुल कॉम्प्युटरचे संचालक श्री.सुनील महाजन सर व ओम कॉम्प्युटर चे संचालक श्री.संजय सोनवणे सर यांनी "सायबर क्राईम" या विषयावर व्याख्यान दिले. तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन याबाबत देखील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधीक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील तर आभार संदीप सोनवणे यांनी मानले
0 टिप्पण्या