चाळीसगाव आश्रम शाळेत शिक्षक दिन साजरा

 देवळी आश्रम शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

     नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे शिक्षक उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार खैरनार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश पाटील यांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले



  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील यांनी मांडला. तर शिक्षक दिनाचे महत्व राजू पाटील यांनी सांगितले. तसेच आजच्या शाळेतील सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी सांभाळली होती त्यात महत्त्वाची भूमिका रंजीत पावरा, निलम बारेला या विद्यार्थ्यांनी बजावली

         कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार जितेंद्र सुर्यवंशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या