जि .प. उच्च प्राथ. शाळा चैतन्य तांडा नं ४येथे शिक्षक दिनानिमित्त मा. सरपंच महोदया यांच्या हस्ते भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करूनशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांचा मा. सरपंच, उपसरपंच, वि. का. सोसा. चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शिक्षण प्रेमी यांच्या हस्ते शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका राठोड मॅडम यांनी शिक्षकांवर आधारितगीत गायन करून सगळ्यांचे लक्ष वेधले. शाळेतील विद्यार्थी आज मुख्याध्यापक व शिक्षक होते. विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद लूटला.याप्रसंगी मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी गुरूंचे महात्मे सांगितले . आज शाळेचे कामकाज विद्यार्थ्यांनीच केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. पुष्पा राठोड व तिच्या सहकारी मित्र, मैत्रिणींनी शिक्षक म्हणून काम पाहिले.
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या कामी गावातील सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आंनदा भाऊ राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. लिंबा तंवर व दिनकर राठोड पिना, सदस्य ग्रामपंचायत सदस्य व जव्हार् भाऊ राठोड वसंत भाऊ राठोड, प्रकाश राठोड ,भाऊ मामा चव्हाण उदल पवार रघुनाथ राठोड,राजू चव्हाण,साहेबराव राठोड,खिमा राठोड,दिलीप राठोड,दिनकर राठोड,
शिक्षण प्रेमी मंडळींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 टिप्पण्या