पंजाब:
दि. २३ ते २७ ऑगस्ट २०२४ या दरम्यान पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय गतका स्पर्धामध्ये भारत देशातील एकूण १६५० खेळाडूंनी भाग घेतला. यामध्ये २५ पेक्षा जास्त राज्य सहभागी झाली होती. गतका हा पंजाब राज्य चा पारंपारिक खेळ आहे या मध्ये प्रामुख्याने फरी सोटी, सिंगल सोटी, तलवारबाजी, काठी फिरवणे (डेमो इव्हेंट) या खेळ प्रकारात खेळाडू सहभागी होतात. पिंपरी चिंचवड गतका असोसिएशन च्या माध्यमातुन एकुण १४ खेळाडूंनी या राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये भाग घेतला.
भाग्यश्री बांगर या खेळाडूने १७ वर्षाखालील टीम फरी सोटी खेळ प्रकारात रौप्य पदक जिंकले त्याच बरोबर गतका फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने राष्ट्रीय पंच परीक्षा/ शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने स्मिता धिवार या सहभगी झाल्या.
खेळाडूंना प्रशिक्षक किरण अडगळे, संजय बनसोडे, राष्ट्रीय गतका पंच स्मिता धिवार, रविराज चखाले, केतन नवले यांचे मार्गदर्शन लाभले.
सहभागी खेळाडूंची नावे पुढलप्रमाणे.
मुली.
श्रेया दंडे, रीद्धिका पाटील, स्नेहल मर्दाने, ऋतुजा कुलकर्णी, तृप्ती यादव
मुले.
वेदान्त म्हेत्रे, सुरज बांगर, ओम परदेशी, राज वायकोळे, शिवदुत्त सिंघ, गणेश चखाले, नैतिक उणेचा, रविराज चखाले
0 टिप्पण्या