गणगोत फाउंडेशन पनवेल यांच्या वतीने बंजारा तीज महोत्सव उत्साहात साजरा
बातमीदार:- श्रावण महिन्यात तीज हा उत्सव बंजारा समाजातील वर्षातील पहिला सण म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो त्यानुसार सालाबाद प्रमाणे नातीगोती फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या माध्यमातून तीज विसर्जनाचा कार्यक्रम रविवार दिनांक 18. 8. 2024 रोजी नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला
खास महिला व युवतीसाठी असलेल्या या कार्यक्रमात बंजारा वेशभूषा मध्ये महिला व युवतीने सहभाग घेतला व डफड्याच्या तालावरती बंजारा गायन व नृत्य केले
या कार्यक्रमांमध्ये बंजारा समाजातील मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती तसेच सामाजिक, धार्मिक , राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुक्याचे आमदार माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब हे उपस्थित होते
या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रुपेश भाऊ चव्हाण यांनी समाजासाठी हक्काच्या जागेची मागणी आमदार मा.प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे केली .त्यावेळी समाज बांधवांना संबोधित करताना माननीय आमदार साहेबांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून हक्काची जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रूपेश भाऊ चव्हाण तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, याचबरोबर नायक शिवचंद राठोड, कारभारी शंकर चव्हाण, याचबरोबर डायेसांळे ,हसाबी ,नसाबी , व समाज बांधवांनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या