एक राखी देशाच्या सैनिकांसाठी'

 जि. प .उच्च प्राथ. शाळा चैतन्य तांडा नं4 ता.चाळीसगाव येथील अनोखा उपक्रम


एक राखी देशाच्या सैनिकांसाठी'

आज आमच्या शाळेत हा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या स्पीड पोस्टाने जम्मू काश्मीर येथे बॉर्डरवर पाठवण्यात आल्या. शाळेतील मुलींनी मुलांना व कार्यक्रमाला आलेल्या गावातील गावकऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

गावातील कुस्तीपटू कु. हर्षदा वाडीलाल राठोड ही 43kg गटातून कुस्ती स्पर्धेत विभागातून व जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे तिचा सत्कार शाळेमार्फत करण्यात आला व तिची मुलाखत घेण्यात आली. तिच्या मुलाखतीने विद्यार्थी व गावकरी भारावून गेले.


 त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. या अनोख्या उपक्रमासाठी गावातील सरपंच सौ. अनिताताई राठोड, उपसरपंच श्री आनंदा राठोड, शा. व्यव. समितीचे अध्यक्ष श्री . निंबा नवल तवर व सदस्य,भाउलाल चव्हाण, जुलाल भाऊ राठोड, शिक्षणप्रेमी श्री जवाहर भाऊ राठोड, पोलीस पाटील लखन राठोड.दत्तू पवार, उदल पवार्, वाडीलाल राठोड,

श्री. अभिषेक राठोड शिक्षण प्रेमी,महिला, बालगोपाल हजर होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी मेहनत घेतली.

या अनोख्या उपक्रमाचे गावाच्या सर्व थरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या