मराठी भाषा गौरव दिनानिम्मित देवळी आश्रम शाळेत दिंडीचे आयोजन


देवळी  आश्रमशाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन


नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे मराठी भाषा गौरवदिन तसेच  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी लेखक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच  कुसुमाग्रज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सतिष पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.तुषार खैरनार  यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले.

        कार्यक्रमात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पोवाडा, गायन , नाटक, लेझीम पथक, ढोल पथक,  नृत्य सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी मांडले तर मराठी गौरव दिन निमित्त सागर बोरसे यांनी विचार मांडले. 

        कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी तर आभार श्री. रमाकांत कापडणीस यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या