मराठा आंदोलनचा ऐतिहासिक विजय , सर्वत्र जल्लोष

 राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने मराठा  आंदोलनाचा ऐतिहासिक विजय -  चाळीसगावात रयत सेनेच्या वतीने आनंद उत्सव



चाळीसगाव - अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणापासून सुरुवात करून नवी मुबंई पर्यंत मराठा मोर्चाचे नेतृत्व करत लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलकांबरोबर राज्य सरकार ला सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडल्याने मराठ्यांचा लढा यशस्वी झाला असून राज्यातील लाखो मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होणार आहे,मराठ्यांच्या लढ्याला यश आल्याने चाळीसगाव येथे रयत सेनेच्या वतीने दि २७ रोजी शिवाजी घाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पन करत ऐकमेकाना पेढे भरवत मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,एक मराठा लाख मराठा अदि घोषणानी परीसर दुमदुमून गेला

     वाशी येथे मराठा मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढल्याने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जरांगे पाटील यांना जुस देऊन आमरण उपोषण सोडवण्यात आले यानंतर मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की हा राज्यातील सर्व मराठ्यांचा विजय आहे, अध्यादेशाला धोका झाला तर पुन्हा आझाद मैदानावर येणार असे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. शिंदे साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की , सगे सोयऱ्यां बाबत जो अध्यादेश काढला आहे. ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी गुलाल उधळलाय त्याचा अपमान होऊ देऊ नका तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टिकला पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे असं जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले, मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आल्याने चाळीसगाव येथे रयत सेनेच्या वतीने दि २७ रोजी शिवाजी घाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ऐकमेकाना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर गेला यावेळी प्रा चंद्रकांत ठाकरे सरांनी मराठा आरक्षणा च्या लढायला यश आले असल्याने रयत सेनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे असे सांगत मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता.संवैधानिक मार्गाने हा लढा लढल्यामुळे आरक्षणाच्या मागणीला यश आले. मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या संघर्षामुळे राज्यातील मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे लाखो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्याने राज्यातील मराठा समाजात आनंद उत्सव साजरा केला जात असल्याचे सांगितले आहे, यावेळी राजेंद्र पाटील, खुशाल पाटील, पी एन पाटील, प्रदीप देशमुख, स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, अनिल कोल्हे,छोटु अहिरे,सतीश पवार,दिनेश चव्हाण यांच्यासह सकल मराठा बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या