चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक 19 एप्रिल रोजी चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात मा. जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या दौऱ्यानिमित्त प्राथमिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत चाळीसगाव येथे सकल बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
चाळीसगाव येथे मे महिन्यात होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने मंत्री संजयभाऊ राठोड यांच्याशी चर्चा
या बैठकीनंतर ठरल्याप्रमाणे एक शिष्टमंडळ मुंबई येथील मंत्रालयात जाऊन मा. संजयभाऊ राठोड यांच्याशी विशेष चर्चा केली. या चर्चेत मे महिन्यात चाळीसगाव येथे होणाऱ्या समाज एकतेच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचे निश्चित करण्यात आले.
आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या पुढील नियोजनाच्या अनुषंगाने मंत्री संजयभाऊ राठोड साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. हा कार्यक्रम बंजारा समाजाच्या सामाजिक एकतेचे आणि प्रबोधनाचे प्रतीक ठरणार असून, तो अत्यंत भव्य आणि सुसंगठित पद्धतीने पार पडणार असल्याचे संकेत मिळाले.
आजच्या बैठकीत खालील कार्यकर्ते (शिष्टमंडळ )उपस्थित होते:
संजयभाऊ राठोड(वलठाण)
संदिपभाऊ राठोड (वलठाण)
संजयभाऊ राठोड (अंधारी)
विलासराव चव्हाण (सेवानगर)
डॉ. तुषार राठोड (चाळीसगाव)
अजय जाधव (बोढरे)
लक्ष्मण पवार (सांगवी)
संदिप पवार (रोकडे)
लक्ष्मण जाधव गोरखपूर
बबलु चव्हाण घोडेगाव
0 टिप्पण्या