चाळीसगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रमशाळा देवळी येथे संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा
नानासो.उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आदित्य सूर्यवंशी (सचिव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ), सतीश पाटील (प्राचार्य आश्रम शाळा देवळी), तुषार खैरनार (मुख्याध्यापक आश्रम शाळा देवळी) व अजय देशमुख (क्रीडा समन्वय चाळीसगाव) यांच्या हस्ते करण्यात आले.
चौदा वर्षे वयोगटात मुलांच्या संघात आश्रम शाळा देवळी व मुलींच्या संघात माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.दे. या शाळांचे संघ विजयी. सतरा वर्षे वयोगटात मुलांमध्ये आश्रम शाळा मेहुणबारे व मुलींमध्ये माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.दे. या शाळांचे संघ विजयी तसेच एकोणिस वर्षे वयोगटात मुले व मुली दोघी संघ आश्रम शाळा देवळी विजयी . या सर्व वयोगटातील विजयी संघांची जिल्हास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
विजयी झालेल्या सर्व संघांचे कैलासबापू सूर्यवंशी व माईसाहेब जयश्री सूर्यवंशी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेत पंच म्हणून युवराज भोसले, शुभम चौधरी, राहुल साळुंखे, सपकाळे सर, साठे सर यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून निलेश पाटील, विनोद पाटील, अतुल भोसले, ज्ञानेश्वर पाटील, भूषण बहीरम, संदीप पाटील, सागर बोरसे, रवींद्र तडवी व अमोल पगारे यांनी काम पाहिले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक शरद सूर्यवंशी, साहेबराव निकम व संदीप देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.


0 टिप्पण्या