चाळीसगाव 

राष्ट्रीय कन्याशाळा व ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक ५/७/२०२४ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता लोकनायक महेंद्रसिगं राजपूत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब मुलींना गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या ताईसाहेब सौ अनिता पाटील या होत्या सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वंदनाताई निकम यांनी केले याप्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले 

       याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या ताईसाहेब सौ अनिता पाटील, प्रमुख पाहुण्या ताईसाहेब मिनाक्षी निकम, सौ.सुचित्राताई पाटील,मा. नगरसेविका सौ सविता राजपूत.सौ.विजया पवार, सौ.पूजा लाटे, पर्यवेक्षिका ताईसाहेब श्रीमती लतिका हिवरे,

श्री.विरेंद्रसिंग राजपूत, कर्मचारी प्रतिनिधी ताईसाहेब सौ उज्वला पाटील, कर्मचारी प्रतिनिधी दादासाहेब श्री हरिष महाले, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.

वंदनाताई निकम व सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्रीमती अर्चनाताई वाबळे या उपस्थित होत्या 

         आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ताईसाहेब मिनाक्षी निकम यांनी आपल्या भाषणात तात्यासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो असे सांगितले . आजच्या कार्यक्रमा प्रसंगी गरीब मुलींना सेवक श्री.विरेंद्र राजपूत व प्राध्यापक श्री धर्मराज राजपूत यांच्या वतीने ४१ गणवेश वाटप करण्यात आले 

       आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्रीमती अर्चनाताई वाबळे यांनी केले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते