चाकणच्या कंटेनर अपघातातील महिलेचा 46 दिवसानंतर मृत्यू
23 जानेवारी मुलीचा तर 4 मार्चला आईचा मृत्यू
पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट
चाकण एका कंटेनर चालकाने बेफाम वाहन चालवत जवळपास दहा ते बारा वाहनांना धडक दिली 16 जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारा दरम्यान मंगळवारी दिनांक 4 रोजी मृत्यू झाला 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरले अपयशी ठरली
पोर्णिमा अंबादास गाढवे (वय 29 रा. रासे,ता. खेड, जि. पुणे )असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे . जखमी महिलेवर पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवार (दि.४) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन वर पोचली आहे.
अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची नऊ वर्षाची मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती . एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने रासे गावावर शोककळा पसरली आहे.
आरोपीवर तीन गुन्हे दाखल
आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनांना धडक दिली . तसेच पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला . याशिवाय शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाची चांगलीच धुलाई केल्याने, त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.
0 टिप्पण्या