पुणे: दिवस-रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर गुरुवारी एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी हा राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याअनुषंगानेही चौकशी सुरू केली आहे
आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधा या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस करीत आहेत.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधा या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस करीत आहेत.
पोलीस ठाण्याजवळ ‘पोलीस’ म्हणून वावरायचा
दत्ता गाडे याचा नेहमी बसस्थानकावर वावर असायचा अशी माहिती समोर आली आहे. सावज हेरून त्यांना लुबाडण्यासाठी आपण पोलीस असल्याचे सांगायचा. तसे राहणीमानही ठेवायचा. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील ती फॉर्मल शर्ट, पँट आणि शूज याच वेशात होता. त्याने पीडितेशी संवाद साधताना पोलीस असल्याचे सांगितले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
0 टिप्पण्या